रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्यावतीने मुक मोर्चा व धरणे आंदोलन

चाकूर : 11सप्टेंबर /मधुकर कांबळे
मुस्लीम धार्मियांचे धर्मगुरू यांच्या बदल रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ चाकूर येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने मुक मोर्चा व धरणे आंदोलन करून रामगिरी महाराज व आ.नितेश राणे यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या मागणीसाठी चाकूर तहसिल कार्यालयासमोर मुस्लिम समाज बांधव ठाम मांडून बसले होते.यामुळे काहीकाळ नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.धरणे आंदोलनास्थळी प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक दत्ताञय निकम व नायब तहसिलदार दिंगाबर स्वामी यांनी निवेदन स्विकारले.
रामगिरी महाराज व आ.नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी चाकूर येथील सकल मुस्लिम समाजाच्यावतीने सोमवार दि.9 सप्टेंबर रोजी चाकूर शहरातुन मुक मोर्चा काढण्यात आला.आणि चाकूर तहसिल कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील सर्व मुस्लिम व्यापारी आपली दुकाने बंद ठेऊन धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
याबाबत चाकूरचे तहसीलदार यांच्या नावे दिलेल्या निवेदनावर मौलाना इलाही कोतवाल,मौलाना मतीन गुळवे,मौलाना मुज्जफर,मौलाना सद्दाम,मौलाना एजाज कोतवाल,मौलाना वशीम,मौलाना ईस्माइल,मौलाना उमरफारूख ,मौलाना सल्लाउद्दीन,मौलाना मुनिर,नगरसेवक मौलाना मुज्जमिल सय्यद ,मौलाना खालेद,सय्यद,मुर्तुजा सय्यद,इलियास सय्यद,हुसेन शेख,सलीम तांबोळी,साजीद शेख ,बाबुभाई दापकेवाले,इलियास शेख,वशीम घोरवाडे, रियाज पठाण,बशीर मासुलदार,नुर पटेल,बाबा सय्यद,गफुर पटेल,बशीर मासुलदार,मजीद पटेल,दाऊद बागवान,युसुफ शेख,रहेमतुल्ला शेख,यांच्यासह नळेगाव,वडवळ नागनाथ ,मांडुरकी,जानवळ,दापक्याळ,झरी बु.येथील मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे,बिट अंमलदार योगेश मरपल्ले,हणमंत मस्के यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
रिपाइं आठवले गटाच्या वतीने सकल मुस्लीम समाजाच्या मोर्चा व धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरपंचायतचे बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे,तालुकाध्यक्ष पपन कांबळे,लक्ष्मण तिकटे,रंगनाथ वाघमारे,नागसेन महालिंगे,बाबुराव गायकवाड यांनी पाठिब्यांचे पत्र आंदोलनास्थळी दिले.


