चाकूरच्या औद्योगिक सहकारी संस्थेने नवनवीन उद्योग उभारून रोजगारांच्या संधी निर्माण करून द्याव्यात – ना. बाबासाहेब पाटील

चाकूर : 15 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
चाकूर येथील औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेने नवनवीन उद्योग उभारून रोजगारांच्या संधी निर्माण करून द्याव्यात. यासाठी आपण सर्वोत्तोपरी मदत करू असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर येथील औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्यावतीने चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांची राज्याचे सहकार मंत्री व गोंदिया जिल्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे ना. पाटील यांचा सत्कार व उद्योग भवनाचा उदघाट्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ना. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री बाळासाहेब जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल माकणे, पंचायत समितीचे माजी सभापती करीमसाहेब गुळवे, सोसायटीचे चेअरमन गोविंदराव माकणे, माजी सरपंच किशनराव रेड्डी,माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, सहायक निबंधक आदिनाथ पालवे,नगरसेवक मुज्जमील सय्यद, माजी नगरसेवक इलियास सय्यद, राम कसबे, महंमद सय्यद आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की चाकूर औद्योगिक वसाहत संस्था ही विकासाचा दृष्टिकोण समोर ठेवून नावारूपाला आली आहे.यापुढेही औद्योगिक वसाहतीचा विकास अधिक गतीने साधायचा असेल तर सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असून या संस्थेने प्रगती साधत याठिकाणी अनेक लघु उद्योग उभारून विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे. भविष्यात येथे मोठे उद्योग सुरु करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.संस्थेचे चेअरमन म्हणून करीमसाहेब डोंगरे यांनी अतिशय चांगले काम केले असून चेअरमन आणि त्यांचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे चाकूरची औद्योगिक वसाहत संस्था नावारूपाला आली आहे असे सांगून येणाऱ्या काळातही चांगले काम करणाऱ्या माणसांच्याच मागे सभासदांनी उभे राहावे असे म्हणत चेअरमन डोंगरे यांच्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ना.पाटील यांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या उद्योग भवनाचे उदघाट्न करण्यात आले. संस्थेच्यावतीने ना. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार, उद्योजक व अधिकारी यांचा ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन करीमसाहेब डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन हाकाणी सौदागर यांनी तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक पद्माकर जोशी यांनी केले.या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव, भानुदास पोटे, गणपत नितळे, ॲड. संतोष गंभीरे,सिद्धेश्वर अंकलकोटे, मधुकर मुंढे, अब्दुल शेख,गणपत कवठे, अनिल वाडकर, मेघराज बाहेती,दयानंद सुरवसे, संतोष फुलारी,निसार देशमुख,हणमंत लवटे,उमाकांत शेटे,विश्वनाथ एडके,विवेक शिंदे,शिवप्रसाद शेटे, मोहन कुलकर्णी,नागनाथ येरनाळे,विष्णू तिकटे, शिवशंकर हाळे,सतीश फुलारी,संदीप शेटे, अजित शेख,चंद्रमणी सिरसाठ,सचिन तोरे यांच्या सह औद्योगिक वसाहत संस्थेचे संचालक, व्यापारी, उद्योजक, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन करीमसाहेब डोंगरे, व्हॉइस चेअरमन लक्ष्मीकांत बेजगमवार, संचालक गणेश फुलारी, सुरेश हाक्के,मंगेश जानकर,तानाजी तेलंग, श्रीराम वाघमारे, शिवकुमार उस्तुर्गे,तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष मधुकर पाटील,व्यवस्थापक पद्माकर जोशी, किशोर बुरसे,राजेंद्र गोलावर,शेषेराव साळी यांनी पुढाकार घेतला.


