चाकूर तालुक्यातील 216 शिक्षकांनी घेतले शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण.
चार टप्यात बाराशे शिक्षक घेणार प्रशिक्षण

चाकूर : 16 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
तालुक्यातील महाळंग्रा येथील डी. बी. इन्स्टिटयूट मध्ये सुरु असलेल्या चाकूर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात पहिल्या बॅचमध्ये 216 शिक्षकांनी 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पाच दिवसाचे प्रशिक्षण घेतले असून त्यात पहिली ते बारावी वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे.चार टप्यात बाराशे शिक्षक घेणार प्रशिक्षण घेणार आहेत.
या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन, मुल्यांकन, मूल्यमापन, समग्र प्रगती कार्ड, प्रश्न निर्मिती, शाळा मुल्यांकन इत्यादी विषयांवर सुलभकांनी सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता जगन्नाथ कापसे , अधिव्याख्याता संतोष ठाकूर यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन मार्गदर्शन केले.तसेच चाकूरचे गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपुरे यांनीही प्रशिक्षणास दररोज भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले . शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पांचाळ,पटेल यांनीही प्रशिक्षणास भेट दिली. यावेळी गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती, प्रशिक्षण सुलभकांनी आनंददायी पद्धतीने प्रशिक्षण दिले.
सदरील प्रशिक्षण चार टप्यामध्ये होणार असून तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावी वर्गाला अध्यापन करणारे 1200 शिक्षक हे प्रशिक्षण घेणार आहेत.दुसरा टप्पा 17 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होत आहे.हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र चिमणदरे, प्रकाश भालके,जयेश कर्डीले , धनराज सूर्यवंशी , सतिश जाधव,केंद्रे आदी परिश्रम घेत आहेत.


