सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वृंदावन वॉटर पार्कमधील वेव्ह पुलाचे उदघाट्न

चाकूर : 19 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
चाकूर येथील वृंदावन वॉटर पार्क मधील वेव्ह पुलाचे उदघाट्न राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृंदावन वॉटर पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरण अंतर्गत मराठवाड्यातील सर्वात मोठ्या लाटांचा समुद्र म्हणजेच वेव्ह पुलाचे उदघाट्न बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण सत्यसाई संस्थानचे अध्यक्ष उत्तमराव जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर चाकूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे,सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव,नगराध्यक्ष कपिल माकणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पंचायत समितीचे माजी सभापती करीम गुळवे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रतीक लंबे, नायब तहसीलदार शैलेश निकम,शिरूरचे उपसरपंच सुरज पाटील, युवा उद्योजक हेमंत पाटील, माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले की साई नंदनवन वृंदावन पार्क हे मराठवाड्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात एक महत्वपूर्ण पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला आले असून वेव्ह पुलामुळे त्यात मोठी भर पडली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या लाटांचा आनंद मिळणार आहे.या श्रीकृष्ण सत्यसाई संस्थानने धार्मिक व पर्यटन क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही मोठे काम केले आहे. असे सांगून या वृंदावन पार्कसाठी सर्वोत्तपरी मदत करू असे आश्वासन ना.पाटील यांनी दिले. त्याचबरोबर 25 वर्षांपूर्वी या नंदनवनाची उभारणी करून राज्यभरात पर्यटन क्षेत्रात चाकूरची ओळख निर्माण करून दिल्याबद्दल संस्थानचे अध्यक्ष उत्तमराव जाधव,संचालक विशाल जाधव व अमोल जाधव यांचे ना. पाटील यांनी कौतुक केले.आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा तरुणांनी घ्यावा असे सांगून तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहनही ना.पाटील यांनी केले.तसेच श्रीकृष्ण सत्यसाई संस्थानच्यावतीने गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे धनादेश ना. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मानवरांच्या हस्ते करण्यात आले. वेव्ह पुलाचे उदघाट्न व श्रीकृष्ण सत्यसाई संस्थानच्या संकेत स्थळाचा शुभारंभही ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच श्रीकृष्ण सत्यसाई संस्थानच्यावतीने ना. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन दीपरत्न निलंगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल जाधव यांनी केले.या कार्यक्रमास चाकूर व विविध भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.या वेव्ह पुलामुळे वृंदावन वॉटर पार्क मध्ये सुरेख अशी भर पडली असून हे वेव्ह पुल पर्यटकासाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. पी. डी. कदम, अनिल वाडकर, ॲड. संतोष गंभीरे, माजी सरपंच मधुकर मुंढे, नगरसेवक मुज्जमील सय्यद, माजी नगरसेवक इलियास सय्यद यांच्या सह लातूर, चाकूर सह विविध भागातील प्रतिष्ठित नागरिक, वृंदावन पार्कचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


