मंदोदरी वाकडे चाकूरच्या नवीन गटशिक्षणाधिकारी

चाकूर : 1 जून /मधुकर कांबळे
चाकूर पंचायत समितीच्या नूतन गटशिक्षणाधिकारी म्हणून मंदोदरी आप्पासाहेब वाकडे – निकम लवकरच रुजू होणार असून त्यांची शनिवार दि.31 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने चाकूर पंचायत समितीला बदली करण्यात आली आहे.
अमरावती जिल्यातील धारणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.चाकूरचे गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपूरे यांच्या सेवानिवृत्तीमूळे रिक्त झालेल्या जागेवर वाकडे येत असून मंदोदरी वाकडे यांच्या रूपाने चाकूर शिक्षण विभागाला दुसऱ्या महिला गटशिक्षणाधिकारी मिळाल्या आहेत.चाकूर तहसीलचे नायब तहसीलदार शैलेश निकम यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. वाकडे यांच्यामुळे चाकूरला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी मिळाला आहे.
मंदोदरी आप्पासाहेब वाकडे -निकम यांचे मूळ गाव मंगळवेढा जि.सोलापूर असून सासर लातूर जिल्ह्यातील कासार जवळा आहे.त्यांनी एम. आय. टी. कॉलेज पुणे येथून इंजीनियरिंग ही पदवी घेतली असून त्यांची 2018 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती.2019 ते 2022 या तीन वर्षाच्या कालावधीत मुंबई मंत्रालयात वित्त विभागात कक्ष अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली.सध्या पंचायत समिती धारणी जिल्हा अमरावती येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.


