लातूर विभागीय शिक्षण मंडळ सदस्यपदी प्रा.वैजनाथ सुरनर यांची नियुक्ती

चाकूर : 16 ऑक्टोबर / मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील अलगरवाडी येथील रहिवासी तथा फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे अभ्यासक, आणि सध्या झरी (बु.)येथील सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले मराठी विषयाचे अध्यापक , साहित्यिक, दलितमित्र प्रा.वैजनाथ सुरनर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय शिक्षण मंडळ लातूरच्या सदस्यपदी (बोर्ड मेंबर) नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा.सुरनर यांनी परीक्षक,नियामक, तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे.त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार (दलित मित्र), नेहरू युवा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार,होलार समाज भुषण पुरस्कार, अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल चंचल भारती विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब जाधव, सचिव विक्रमसिंह दोडके , आ. बाबासाहेब पाटील,शिक्षक आमदार विक्रम काळे, प्राचार्य गिरीधर कणसे, माजी प्राचार्या रसिका देशपांडे,माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे चाकूर तालुकाध्यक्ष प्रा.दयानंद झांबरे,सचिव मधुकर कांबळे,जुकटा संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे,प्रा.ज्ञानेश्वर चामे,प्रा.भिमराव साळवे,सुधाकर हेमनर ,प्रा. मारोती बुद्रूक, मुख्याध्यापक भगवान खडके,शिवानंद रोडगे, प्रा. शिवाजी खिराडे,प्रा.नारायण खेडकर,प्रा.बालाजी नलाबले आदींनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


