आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पालकमंत्री ना.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासमवेत युवानेते सुरज पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

चाकूर : 5 ऑक्टोबर (मधुकर कांबळे )
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या समवेत राष्ट्रवादीचे युवानेते तथा शिरूर ताजबंदचे उपसरपंच सुरज बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्यातील देवंग्रावाडी, मुरंबी ते महाळंग्रावाडी येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
या पाहणीत पालकमंत्री ना. भोसले यांना अतिवृष्टीमुळे या भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पुलाचेही मोठे प्रमाणात नुकसान झाले आहेत. पुल वाहून गेला आहे. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत तर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी पुलाची दुरुस्ती करावी तसेच सद्यस्थितीत या भागात विद्यार्थी,शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था ताबडतोब करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री तथा आ. संजय बनसोडे,जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना,अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यशवंत जाधव, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल वाडकर,ॲड. संतोष गंभीरे पाटील,ॲड. संतोष माने,सोपान मनाळे,नामदेव शिंदे,मोहन जाधव,हनुमंत लवटे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप शेटे,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके, विवेक शिंदे, चाकूर युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण, चंद्रमणी सिरसाठ, इस्माईल शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??