आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुकटा संघटनेच्या लातूर विभागीय अध्यक्षपदी प्रा.बाळासाहेब बचाटे यांची बिनविरोध निवड

चाकूर : 3 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
लातूर विभागीय जुकटा संघटनेच्या अध्यक्षपदी चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्रा. बाळासाहेब बचाटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रा.बचाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
औसा येथे जुकटा महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.विलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या लातूर विभागीय जुकटा संघटनेच्या बैठकीत प्रा. बाळासाहेब बचाटे यांची लातूर विभागीय जुकटा संघटनेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
निरीक्षक प्रा.विलास जाधव यांनी लातूर,धाराशिव व नांदेड विभागातील अध्यक्ष,सचिव यांची बैठक घेऊन त्या बैठकीत लातूर विभागीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच पुणे येथील महासंघाच्या बैठकीत या निवडीला मान्यता देण्यात आली. विभागीय कार्यकारणीत राज्य कार्याध्यक्ष म्हणून प्रा. रमेश नन्नावरे धाराशिव, सचिव म्हणून प्रा.नारायण गाढवे यांची तर प्रा. शिवराम सूर्यवंशी हे राज्य प्रतिनिधी, विभागीय उपाध्यक्ष प्रा. किशन गायकवाड,कोषाध्यक्ष प्रा. आर.पी. केंद्रे व देशमुख प्रसिद्धी प्रमुख प्रा.राजेंद्र नागरगोजे, महिला प्रतिनिधी म्हणून प्रा.सुजाता कांबळे नांदेड, प्राध्यापिका रोडे लातूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.विलास जाधव यांनी काम पाहिले व त्याला महासंघाची मान्यता दिली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून प्रा.शिवाजी शिंदे, प्रा, मुकुंद बोकारे, मोतीभाऊ केंद्रे विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीचे विभागातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??