चाकूरात विविध मागण्यांचे जुकटा संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन

चाकूर : 19 मार्च /मधुकर कांबळे
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्याचे निवेदन जुकटा संघटनेच्यावतीने चाकूरचे तहसीलदार यांना देण्यात आले.
सोमवार दि. 17 मार्च 2025 रोजी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी जुकटा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा.बाळासाहेब बचाटे यांच्या नेतृत्वाखाली चाकूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनात जुनी पेन्शन योजना लागू करावी , वाढीव टप्पा त्वरित द्यावा , शिक्षक समायोजन, आश्वासित प्रगती योजना, वाढीव पद, अकरावीचे ऑनलाईन प्रवेश, रिक्त पद भरती, सरसगट निवड श्रेणी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. उपरोक्त मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. सरकारने या मागण्याचा सहानुभूतीने विचार करून मागण्या मान्य कराव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन देताना जुकटाचे विभागीय अध्यक्ष प्रा. बाळासाहेब बचाटे,चाकूर तालुकाध्यक्ष प्रा. गजानन पाटील अहमदपूर तालुकाध्यक्ष, प्रा. अंगद बोबडे , प्रा. दयानंद झांबरे, प्रा. वैजनाथ सुरनार, प्रा. ज्ञानेश्वर चामे, प्रा. बी. जी. नलाबले, प्रा. एस. एस. खिराडे,प्रा. बी. एस. पासामे,प्रा. बी. एम.साळवे,प्रा. डी. एन. हेमनर,श्रीमती प्रा.एस.टी.गायकवाड,प्रा.एस. एल. नागराळे,प्रा.आर. एन शिंदे, प्रा. ए.जी. राठोड, प्रा. व्ही. व्ही.पासमे,प्रा. बी.एन.साळुंखे,प्रा. एस एस पटेल , प्रा.एच.एल. मुजावर,प्रा. एच. बी. शिंदे , प्रा.जी.एम. वाडकर ,प्रा.यु. ए. शेख , प्रा.बी. डी. मोरे ,उपस्थित होते.


