आ. बाबासाहेब पाटील यांनी घेतली तिसऱ्यांदा विधानसभा सदस्य पदाची शपथ

चाकूर : 7 डिसेंबर /मधुकर कांबळे
आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईत सुरू झाले असून या विशेष अधिवेशनात चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेच्या पद व गोपनीयतीची शपथ विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्याकडून घेतली.
पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघांचे आमदार बाबासाहेब पाटील हे विधान भवनात दाखल झाले. त्यांनंतर त्यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतली.चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार म्हणून आ. बाबासाहेब पाटील यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की या पाच वर्षात अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यास माझे प्राधान्य असून मतदार संघातील विकास कामाच्या माध्यमातून मतदार संघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याची त्यांनी सांगितले.


