आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नामुळे अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 60 कोटी दहा लाख रुपयांच्या कामांना मंजुरी.

चाकूर : 19 जुलै / मधुकर कांबळे
चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 60 कोटी दहा लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून आ. पाटील यांचे दोन्ही तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ (बॅच-१) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्ती व विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पुढील कामांचा समावेश आहे.
अहमदपूर तालुक्यातील राज्य महामार्ग -249 शिरूर ताजबंद – चोबळी- माकणी-उमरगा- येल्लादेवी – खरबवाडी ते तालुका सरहद्द रस्ता. एकूण लांबी 10.150 किमी.असून या कामासाठी 13 कोटी 41 लक्ष रुपये, राज्य महामार्ग -56 धानोरा -हिप्पळगाव – हाडोळती – आनंदवाडी तालुका सरहद्द रस्ता. एकूण लांबी 3.150 किमी. 4 कोटी 42 लक्ष रुपये ,रामा-56 ते लांजी -तांबटसावंगी प्रजिमा -21 विळेगाव – मानखेड -केंद्रेवाडी – अंधोरीरस्ता. एकूण लांबी 15.720 किमी. 23 कोटी 43 लक्ष रुपये तर चाकूर तालुक्यातील प्रजिमा 30 टाकळगाव रस्ता. एकूण लांबी 4.100 किमी. 5 कोटी 52 लक्ष रुपये व सुगाव ते आष्टा राममा-63 रस्ता. एकूण लांबी 7.230 किमी. यासाठी 13 कोटी 30 लक्ष रुपये.अशा एकूण 5 रस्त्यांच्या 60 कोटी 10 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
आ.बाबासाहेब पाटील यांनी सातत्याने शासन स्तरावर या कामांचा पाठपुरावा केला होता. आता या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच निश्चित कालावधीत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आ. बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारामुळे अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांची स्थिती सुधारून नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. या कामांना मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, कार्यकारी अभियंता खैराती व उपअभियंता डी.आर. मुकदम यांचे आभार आ. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हा प्रकल्प केवळ रस्ते दुरुस्तीपुरता मर्यादित नाही, तर तो ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. या कामांमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यवसायिक व सामान्य नागरिक यांना आपले दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल. प्रवासाच्या वेळेची बचत होईल व वाहतुकीच्या सुविधा सुधारतील. या रस्त्यांच्या विकासामुळे मतदारसंघात ग्रामीण आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती होणार आहे.
===================
आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघ


