आ.बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नामूळे चाकूर, नळेगाव, शिरूर ताजबंद व किनगाव बसस्थानकातील काँक्रीटीकरणासाठी 9 कोटी 89 लाखाचा निधी मंजूर

चाकूर : 29 जुलै /मधुकर कांबळे
चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्न व सततच्या पाठपुराव्यामुळे चाकूर व अहमदपूर तालुक्यातील चाकूर , नळेगाव, शिरूर ताजबंद व किनगाव या चार बसस्थानकातील काँक्रिटीकरणासाठी 9 कोटी 89 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे चारही बस स्थानकाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. हा निधी मंजूर करून आणल्याबद्दल प्रवाशातून आ. बाबासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
चाकूर तालुक्यातील चाकूर व नळेगाव तर अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद व किनगाव या बसस्थानकाचा यात समावेश आहे.यामध्ये चाकूर बसस्थानकसाठी 2 कोटी 95 लक्ष, शिरूर ताजबंद साठी 2 कोटी 69 लक्ष, नळेगावसाठी 2 कोटी 64 लक्ष तर किनगाव बसस्थानकासाठी 1 कोटी 69 लक्ष रुपये असे 9 कोटी 89 लक्ष रुपये या चार बसस्थानकाच्या कॉंक्रिटीकरणासाठी मंजूर करण्यात आले आहेत.
अनेक दिवसापासून चारही बसस्थानकातील बरीच काँक्रीट खडी उघडली पडली असल्यामुळे दुरावस्था झाली असून बसस्थानकात येण्याऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास करावा लागत आहे. बस चालकांनाही बस बसस्थानकात आणताना व बाहेर घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.अनेकवेळा बस स्थानकातील खुली खडी किंवा लहान दगड उडून स्थानकातील प्रवाशांना लागली असल्याच्याही घटना घडल्या आहेत.या नवीन काँक्रिटीकरणामुळे बस स्थानकातील रस्ता व बस थांबा परिसर काँक्रीटचा होणार असल्यामुळे चारही बस स्थानकाचा कायापालट होणार आहे.


