आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कलकोटीच्या माजी सरपंच कलावतीबाई तिकटे यांचे दुःखद निधन, उद्या अंत्यसंस्कार

चाकूर : 2 सप्टेंबर / प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील कलकोटी येथील रहिवाशी तथा माजी सरपंच कलावतीबाई लक्ष्मणराव तिकटे यांचे आज सोमवार दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्या 60 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी 9 वाजता कलकोटी येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, पाच मुली असा परिवार असून चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा रिपाइंचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव तिकटे यांच्या त्या पत्नी होत.हल्लाबोल परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


